सावधान : तुमच्या नेहमीच्या चुकामुळे होवू शकते डोळे खराब !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जानेवारी २०२३ हिवाळ्यात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आरोग्याची नेहमी काळजी घेत असतांना दिसून येत असतो. आपण फक्त डोळ्यांनी संपूर्ण जग बघू शकतो. तेव्हा त्याची योग्य काळजी घेणे हे आपले प्रथम कर्तव्य असायला हवे. आज आपण अशा काही चुका जाणून घेणार आहोत ज्याने तुमच्या डोळांच्या आरोग्यावर वाइट परिणाम होतो. टेक्नॉलॉजिच्या वाढत्या वापरामुळे आणि डिजिटलायझेशनमुळे सध्या स्क्रिनचा वापर वाढलाय. याने तुमच्या डोळ्यावर वाइट परिणाम होतो. डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोकेदुखी, डोळे ड्राय होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. तुमच्या कोणत्या चुकांचा नेमका तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो ते जाणून घेऊया.

डोळे गरम पाण्याने धुणे – अनेक लोक त्यांचे डोळे गरम पाण्याने धुतात. मात्र ही सवय चुकीची आहे. डोळे कधी नॉर्मल पाण्याने किंवा थंड पाण्याने धुवावे.
पापण्यांची हालचाल न होणे – पापण्यांची सतत हालचाल डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार चांगली असते. त्याने डोळ्यांमध्ये साचलेली घाण बाहेर येते. मात्र टीव्हीपुढे बसल्यावर अनेकजण त्यांच्या पापण्यांची अजिबात हालचाल होत नाही. तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते.

आर्टिफिशियल आय ड्रॉपचा जास्त वापर – अनेक डोळ्यांच्या त्रासाला कंटाळून आर्टिफिशियल आय ड्रॉपचा जास्तीत जास्त वापर करतात. याचा वापर तुमच्या डोळ्यांना ड्राय करू शकते. एक्सपर्टच्या मते, दीर्घकाळासाठी बेस्ट आय ड्रॉपचा वापर करावा.

झोपताना आय मास्कचा वापर करणे – अनेक लोक झोपताना आय मास्कचा वापर करतात. आय ड्रॉपचा जास्तीत जास्त वापर डोळ्यांसाठी धोक्याचा ठरू शकतो. एक्सपर्टच्या मते इनफेक्शपासून बचाव करण्यासाठी ठंड्या पॅकचा वापर करा.

डोळ्यांना चोळणे – बरेचदा लोक डोळ्यांना खाज येते म्हणून वारंवार चोळतात. मात्र एक्सपर्टच्या मते असे करणे धोकादायक ठरू शकते. याने तुमचे डोळे डॅमेज होऊ शकतात. डोळ्यांची खाज थांबवण्यासाठी डोळे थंड पाण्याने धुवा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम