शांततेत उत्सव साजरे करा – तहसीलदार देवरे

पारोळ्यात गणेश विसर्जन मार्गाची प्रशासनाकडून पाहणी

बातमी शेअर करा...

पारोळा
गणेश उत्सव व येणारी ईद हे उत्सव गणेश भक्तांनी व पारोळा तालुक्यातील नागरिकांनी शांततेत व आनंदाने साजरे करावेत. असे आवाहन तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी केले आहे. गणेश विसर्जन मार्गाची पाहणी प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार, प्रशासक मुख्याधिकारी किशोर चव्हाण, महावितरण चे शहर अभियंता गौतम मोरे, शहर तलाठी
निशिकांत माने , सहाय्यक फौजदार सुनील पवार, तामसवाडी तलाठी सचिन क्षिरसागर, म्हसवे तलाठी वैभव ठाकूर , गोपनीय विभागाचे महेश पाटील, पो.का. किशोर भोई उपस्थित होते.
यावेळी तालुका प्रशासनाच्या वतीने नगरपालिका चौक, गाव होळी चौक, गुजराथी गल्ली, बालाजी मंदिर, राम मंदिर चौक यासह विविध ठिकाणची पाहणी करण्यात आली. यावेळी सहाय्यक फौजदार सुनील पवार यांनी सदर विसर्जन मिरवणूक ही कोणत्या मार्गाने कशी जाते.
याबाबत माहिती दिली. दरम्यान गणेश उत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात मंडळाच्या सदस्यांनी, मंडळ परिसरात गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन, भाविकांना सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले. तसेच गणेश मंडळाच्या सदस्यांनी आपले देखावे समाज प्रबोधन पर
असावेत. सीसीटीव्ही लावावे. नगरपालिकेच्या माध्यमातून गणेश मंडळाच्या उत्कृष्ट देखावा कामगिरी बाबत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त मंडळांनी पालिकेच्या स्पर्धेत सहभागी होऊन दहा दिवसाचा आनंद घ्यावा.

मंडळाच्या सुरक्षिततेसाठी, पोलीस मित्र उभे करावे – पोलीस निरीक्षक सुनील पवार
प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या मंडळाची व गणेश भक्तांची सुरक्षितता आबाधित राखण्यासाठी आपल्याच मंडळ सदस्यातून पोलीस मित्र तयार करावेत व ही जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे निभावावी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम