केद्रीय मंत्री गडकरी यांना पुन्हा धमकी ; सुरक्षेतत मोठी वाढ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ मे २०२३ । देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील दिग्गज नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या निवासस्थानी फोनवरून धमकी देण्यात आल्याने त्यांच्या नागपूर वर्धा रोडवरील घर आणि सावरकर नगरातील कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गडकरी यांना यापूर्वी नागपूरच्या कार्यालयात धमकी देऊन खंडणी मागण्यात आली होती. संबंधित आरोप कर्नाटकातील कारागृहात बंदिस्त होता. त्याला नागपूर पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. आता दिल्लीतील कार्यालयात धमकीची फोन घेल्याने पोलिस यंत्रणा सावध झाली असून गडकरी यांचे नागपुरातील घर आणि कार्यालयाचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. दोन्ही ठिकाणी सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत. गडकरी यांच्या दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानी हा दूरध्वनी आला. कार्यालयातील कर्मचाऱ्याने फोन उचलल्यानंतर गडकरी यांना जिवे मारण्याची धमकी समोरील व्यक्तीने दिली.

तसेच निवासस्थानी बीडीडीएसचे पथकदेखील पाठविण्यात आले होते. गडकरी यांच्या कार्यालयात कुख्यात जयेश पुजारी उर्फ शाकीर याने बेळगाव कारागृहातून जानेवारी व मार्च महिन्यात फोन करून खंडणी मागितली होती. या प्रकरणात जयेशला नागपुरातही आणले होते. त्याचा दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे. गृहमंत्रालयाने याची गंभीर दखल घेऊन हे प्रकरण ‘एनआयए’कडे चौकशी सोपवले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम