महिन्याच्या अखेरील जोरदार पावसाची शक्यता !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ ऑगस्ट २०२३ | देशभरातील अनेक राज्यात पाऊस मुसळधार सुरु असून तर काही भागात हजेरी देखील नसल्याने देशातील शेतकरी हैराण झाले आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस चांगला पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र रविवारी राज्यात केवळ मोजक्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सोमवार व मंगळवारी कोकण, मुंबईसह घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम तर हलका पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

९० दिवस होत आले तरी मुंबई-कोकण वगळता अजूनही राज्यातील बहुतांश भागांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे पिके संकटात आली आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने बहुतांश धरणातील पाणीसाठे पिण्यासाठी राखीव ठेवले आहेत. रविवारी धाराशिव ५ मिमी, परभणी १७, रत्नागिरी ९, सातारा २, डहाणू २, नाशिक २, माथेरान ४५, महाबळेश्वर २६, मुंबई २१, कोल्हापूर २, ठाणे १०, बीड ६ मिमी नोंद झाली. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. पूर्व टोक गोरखपूर, दरभंगा, बालूरघाट ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. पश्चिम आसाम परिसरावर, तसेच तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण अंतर्गत कर्नाटक पासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात ढगाळ हवामानासह, उकाडा कायम आहे. तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळात हलक्या सरी पडत आहेत. पावसाची उघडीप असलेल्या भागांत उन्हाचा ताप वाढला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम