राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ एप्रिल २०२३ ।  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादळी पावसासह गारपीट होत आहे. दरम्यान एप्रिलच्या शेवटीही पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक हवामान असल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे. आज दि. २६ राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी. तर उर्वरित राज्यात 30 ते 40 किमी राहील. मध्य प्रदेश व सभोवतालच्या परिसरावर 900 मीटर उंचीवर गोलाकार वाऱ्यांची स्थिती असून ती महाराष्ट्रापासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा आणि वारा खंडितता प्रणाली कायम असल्याने पावसाचे वातावरण आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम