संकटाचा सामना करण्यासाठी या मंत्राचा करा जप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ एप्रिल २०२३ ।  प्रत्येक दिवस व्यक्तीचा खास असतो पण काही धार्मिक माहितीनुसार प्रत्येक एक दिवस एका एका देवाला दिलेला असल्याने म्हणुनच दिवस खास असतो. त्यातील बजरंगबली हनुमानाचे नाव घेतल्यानेदेखील संकट दूर होते असे म्हणतात. केवळ मंगळवारच नाही तर आठवड्यातील सातही दिवस हनुमानजींचे नामस्मरण केले आणि स्मरण केले तर प्रत्येक कामातले अडथळे दूर होण्यास सुरुवात होते. असे मानले जाते की बजरंगबलीचे खऱ्या मनाने आणि पूर्ण भक्तीने स्मरण केल्यास देव भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. शास्त्रात असे अनेक मंत्र आणि तंत्र सांगितल्या गेले आहेत, ज्याचा वापर करून बजरंगबली सहज प्रसन्न होऊ शकतात. तुलसीदासांनी रचलेल्या रामचरितमानसमध्ये अनेक मंत्रांचा वापर चौपाईच्या स्वरूपात करण्यात आला आहे. या मंत्रांचा जाप विधी व नियमांसोबत केल्यास समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

ज्योतिष शास्त्रानुसार हनुमानजींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक मंत्र सांगण्यात आला आहे. असे म्हणतात की हा मंत्र खूप शक्तिशाली आहे. या मंत्रात भगवान राम आणि त्यांचे भक्त हनुमान जी यांची स्तुती करण्यात आली आहे. या मंत्रात 3 श्लोक आहेत. ज्यामध्ये भगवंताची आराधना करताना त्याच्या अपार, अखंड भक्तीची मागणी करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या मंत्राविषयी.

या मंत्राचा करा जाप
शान्तं शाश्वतमप्रमेयमनघं निर्वाणशान्तिप्रदं ब्रह्माशम्भुफणीन्द्रसेव्यमनिशं वेदान्तवेद्यं विभुम्‌।
रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिम्‌॥1॥
नान्या स्पृहा रघुपते हृदयेऽस्मदीये सत्यं वदामि च भवानखिलान्तरात्मा। भक्तिं प्रयच्छ रघुपुंगव निर्भरां मे कामादिदोषरहितं कुरु मानसं च॥2॥
अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्‌। सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥3॥
असा करा मंत्र जाप
या मंत्राचा योग्य प्रकारे जप केला तरच त्याचे फायदे मिळतात. हनुमान चालिसानंतर हा श्लोक रोज 7 वेळा पाठ केला जातो. या मंत्राचा जप करताना त्यांच्याकडून काहीही मिळवण्याची इच्छा करू नका आणि त्यांच्याकडे काहीही मागू नका. असे अनेक दिवस सतत केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतात. यासोबतच हे लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही हा विधी कराल तेव्हा सात्वीक जीवन जगा. ब्रह्मचर्याचे पालन करा. तसेच आहार शुद्ध ठेवा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम