
मुंबईच्या होम ग्राऊंडवर चेन्नईची दमदार कामगिरी !
दै. बातमीदार । ८ एप्रिल २०२३ । प्रत्येक व्यक्तीचे लक्ष लागून असलेल्या आजच्या सामन्यावर यात चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स या हाय व्होल्टंज सामन्यात मुंबईच्या होम ग्राऊंडवर चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी 4 षटकात 38 धावा करत चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला.
मात्र तुषार देशपांडेने मुंबईच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. त्याने रोहितचा 21 धावांवर त्रिफला उडवला. यानंतर इशान किशन आणि ग्रीन यांनी डाव सावरत संघाला 64 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र रविंद्र जडेजाने इशान किशनला 32 धावांवर बाद करत मुंबईचा सेट झालेला फलंदाज माघारी धाडला. पाठोपाठ सूर्यकुमार यादव देखील सँटनरच्या गोलंदाजीवर 1 धावेची भर घालून परतला.
या पडझडीनंतर ग्रीन आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जडेजाने ग्रीनला 12 तर सँटनरने अर्शद खानला 2 धावांवर बाद करत मुंबईची अवस्था 9.1 षटकात 5 बाद 76 धावा अशी केली. रविंद्र जडेजा आणि मिचेल सँटनरच्या फिरकीपुढे मुंबईचे रथी महारथी फलंदाज फक्त हजेरी लावून परतले. या जोडीने मुंबईची अवस्था 5 बाद 76 धावा अशी केली. पॉवर प्लेमध्ये रोहितच्या धक्क्यातून सावरत असतानाच मुंबईला रविंद्र जडेजाने अजून एक धक्का दिला. त्याने 21 चेंडूत 32 धावा करणाऱ्या इशान किशनला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात मिचेल सँटनरने सूर्यकुमार यादवला 1 धावेवर बाद करत अजून एक मोठा धक्का दिला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम