चेतन भगतला उर्फिने दिले सडेतोड उत्तर ; पोस्ट केली व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ नोव्हेबर २०२२ । उर्फी जावेद नेहमी सोशल मिडीयावर चर्चेत असते. त्यासोबतच तिची फॅशन सेन्स जगजाहीर आहे. कोणत्याही ट्रोलिंगला न जुमानता उर्फी चित्रविचित्र कपड्यांमध्ये फोटोशूट करताना दिसते. तिच्या याच फॅशन सेन्सवर प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी टीका केली. मोबाइल फोनचं व्यसन देशातील तरुणाईवर कशा पद्धतीने नकारात्मक परिणाम करतंय हे सांगताना त्यांनी उर्फीचं उदाहरण दिलं. उर्फीच्या फोटो आणि व्हिडीओंना इन्स्टाग्रामवर कोट्यवधी लाईक्स असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता चेतन भगत यांच्या याच टीकेवर उर्फीने उत्तर दिलं आहे. यावेळी तिने ‘मी टू’ मोहिमेदरम्यान त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा उल्लेख केला आहे.

चेतन भगत काय म्हणाले?
“उर्फी जावेदच्या फोटोंवर कोट्यवधी लाईक्स असतात. देशाचा एक तरुण असा आहे जो कारगिलमध्ये बसून देशाची सुरक्षा करतोय आणि दुसरीकडे काही तरूण उर्फीच्या फोटोंना लाईक करतायत”, असं ते एका कार्यक्रमात म्हणाले.

 

उर्फी म्हणाली…
उर्फीने चेतन भगत यांच्या या वक्तव्यावर इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट लिहित उत्तर दिलं. ‘मी टू मोहिमेदरम्यान कशाप्रकारे अनेक महिलांनी त्यांच्यावर आरोप केले होते, हे विसरू नका’, असं तिने लिहिलं. यासोबतच तिने मी टू मोहिमेदरम्यान व्हायरल झालेले चेतन भगत यांचे व्हॉट्स ॲप मेसेजेसचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला.
‘तुमच्यासारखे पुरुष हे स्वत:च्या उणीवा स्वीकारण्यापेक्षा नेहमीच दुसऱ्या महिलांना दोष देतात. तुम्ही विकृत आहात याचा अर्थ असा नाही की मुलीचा दोष आहे किंवा ती कोणते कपडे परिधान करतेय याचा दोष आहे. गरज नसतानाही माझा त्या संवादात उल्लेख केला आणि कपड्यांवर टिप्पणी केली. माझ्या कपड्यांमुळे देशातील तरुणांचं लक्ष विचलित होत असेल, तर तुम्ही मुलींना पाठवलेले मेसेज वाचून ते विचलित होणार नाहीत का’, असा सवाल उर्फीने केला. ‘रेप कल्चरचं प्रमोशन करणं थांबवा. पुरुषांच्या वागणुकीसाठी महिलांच्या कपड्यांना दोष देणं हे खूप जुनाट झालं आता. स्वत:पेक्षा अत्यंत कमी वयाच्या मुलींना तुम्ही मेसेज केले, तेव्हा हे विचार कुठे गेले? तुमच्यासारखे लोक तरुणांची दिशाभूल करतात. मुलींच्या कपड्यांना दोष देण्यासाठी तुम्ही पुरुषांना प्रोत्साहन देत आहात’, अशा शब्दांत उर्फीने चेतन भगत यांना फटकारलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम