या कारणासाठी मुख्यमंत्री शिंदे व शरद पवार यांच्या बोलणे सुरु…
दै. बातमीदार । २६ एप्रिल २०२३ । राज्यात गेल्या महिन्यापासून महाविकास आघाडीत बिघाडी तर राज्यात उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांचे नागपूरसह पुण्यात झळकलेले भावी मुख्यमंत्री पदाची होर्डीगने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. बारसू येथील प्रकल्पामद्धे शरद पवार आता मध्यस्थी करणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी बारसू येथील जागेसंदर्भात केंद्राला पत्र दिल होतं. त्यामुळे या प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्यानी स्थानिकांची बाजू घेतली आहे. अशातच शरद पवार बारसूच्या संदर्भात माहिती घेत आहेत. या दरम्यान शरद पवार यांनी सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी काल चर्चा केली त्यानंतर आज त्यांनी भेट घेतली. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बारसू येथील स्थानिकांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. रानतळे चेकपोस्टवर विनायक राऊत यांची गाडी अडवण्यात आली आहे. बारसू येथे कलम 144 लागू केलं असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम