मुख्यमंत्रीच्या पुत्राच्या सभेला गर्दीच नाही; राज्यभर रंगली चर्चा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ नोव्हेबर २०२२ राज्यात मूळ शिवसेना आमचीच म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभर ढोल वाजविले असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या सभेला जनतेसह शिवसैनिकानी हजेरी लावली नसल्याची चर्चा राज्यभर सुरु झाली आहे. या सभेनंतर चर्चा रंगली ती म्हणजे गर्दीची. कोणाच्या भाषणाला जनतेने किती हजेरी लावली याने अनेक तर्क वितर्क सध्या लावण्यात येत आहेत. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या भाषणात गर्दी नसल्याने खुर्च्या उचलाव्या लागल्या असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्यामुळे चौफेर टीका होत असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच चर्चेत आले आहेत. सत्तार यांच्या मतदारसंघात काल श्रीकांत शिंदे यांची सभा होती. या सभेला लाखो लोकांची गर्दी असेल असा दावा सत्तार यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात उलटं चित्र या सभेत दिसून आलं. भाषण सुरु असतानाच रिकाम्या खुर्च्या उलचण्याचं काम सुरु करण्यात आल असल्याचा व्हिडीओ समोर आलं आहे. हा व्हिडीओ पाहता उद्धव ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे यांनी व्हिडीओ शेअर करत श्रीकांत शिंदेंवर टोलेबाजी केली आहे.
व्हायरलं होणारा हाच व्हिडिओ आंबादास दानवेंनी शेअर करत सत्तार यांना टोला लगावला आहे. “मैदान भरले नाही म्हणून कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे चालू भाषणात खुर्च्या उचलण्याची वेळ काल रात्री आली. लाखोंचा जनसमुदाय येणार असल्याची वल्गना कुठे गेली? लोकांना भाषण आवडलं नसेल कदाचित अशा शब्दात दानवे यांनी व्हिडीओ शेअर करताना टोलेबाजी केली आहे.
सभा सुरु असतानाच उपस्थितांपैकी अनेकजण मैदानातून बाहेर पडू लागले तेव्हा मंचावरुन सत्तार यांनी ओरडून सभा संपेपर्यंत कोणीही मैदानाबाहेर पडू नये असं सांगितलं. मात्र त्याचा लोकांना फारसा परिणाम झाला नसल्याचेही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम