
मुख्यमंत्री शिंदे संघ कार्यालयात दाखल ; राजकीय चर्चेला उधान !
दै. बातमीदार । २९ डिसेंबर २०२२ । हिवाळी अधिवेश सुरु असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संघाच्या नागपुरातील रेशीमबाग कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडून डॉ. हेडगेवारांना अभिवादन करण्यात आले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
रेशीमबाग कार्यालयास भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला अ दर्जा सोबतच तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोळवलकर यांच्या स्मृतिंनाही एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. कोणत्याही दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री आरएसएसच्या कार्यालयात येण्याची पहिलीच वेळ होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, हे स्थळ एक प्रेरणास्थान आहे. मी लहान असताना संघाच्या कार्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री झाल्यानंतर याठिकाणी नतमस्तक व्हायला आलो. इथे आल्यावर समाधान मिळाल्याचेही नुख्यमंत्री एकनाथ शिंदें म्हणाले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम