मुख्यमंत्री शिंदेंनी दिली पंतप्रधान मोदींना अनोखी भेट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० फेब्रुवारी २०२३ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचं उदघाटन करण्यात आलं दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या दोन ट्रेन मुंबई ते सोलापूर किंवा मुंबई ते साईनगर शिर्डी असा प्रवास करणार आहे. या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विघ्नहर्ता गणेशजींची मुर्ती आणि वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचं प्रतिमा त्यांना भेट स्वरुप देण्यात आली.

ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन असेल. या गाडीची ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असली तरी सर्वसाधारण मार्गावर 100-120 किमी तर घाट परिसरात ताशी 55 किमी वेगाने चालवण्यात येणार आहे. या एक्सप्रेसमुळे सीएसएमटी आणि सोलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढेल. सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्रांशी जलद कनेक्टिव्हिटी होईल.सुपरफास्ट ट्रेनला 7 तास 55 मिनिटे लागतात तर वंदे भारतला 6 तास 30 मिनिटे लागतील

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम