मुख्यमंत्री शिंदे तिथे करार होतात ; संजय राऊतांची टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ जानेवारी २०२३ । राज्यातील ठाकरे गट व शिंदे गटात नियमितपणे आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतानाच आज मुख्यमंत्री शिंदे दावोस दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. उद्योगधंद्यांच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र याच दौऱ्यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “दावोसमधून काय येतंय माहित नाही पण नाकासमोरून जे उद्योग पळवून नेते ते आधी आणा – २ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक गुजरात व इतर राज्य घेऊन गेले ते आधी आणा तर त्या दौऱ्याला अर्थ आहे. तिथे कसे करार होतात आम्हाला माहित आहे. आत्तापर्यंत तिकडे जाऊन कोणी किती करार केले किती कंपन्या आल्या हे कोणी सिद्ध करू शकलं नाही. पण आम्हाला डोळ्यासमोर दिसतं की महाराष्ट्रात आलेले प्रकल्प कोणीतरी घेऊन गेलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम