मुख्यमंत्री शिंदे उभारणार जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन !
देशातील अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील जनता पर्यटन करण्यासाठी जात असता, त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना निवासासाठी अनेक अडचणीत येत असल्याने आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्यावर मोठा निर्णय घेणार असून त्यासाठी मागणी देखील त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र-जम्मू काश्मीरचे सांस्कृतिक संबंध दृढ व्हावेत, यासाठी प्रयत्नशील राहू, असेही शिंदे यांनी सिन्हा यांना सांगितले. सध्या शिंदे जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र भवनाच्या मागणीसह अन्य विषयांवरील चर्चेसाठी शिंदे यांनी सिन्हा यांची भेट घेतली. जम्मू-काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र भवन उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठी श्रीनगरमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे केली
या भेटीत भवनाच्या जागेच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर शिंदे यांनी सिन्हा यांना पत्रही दिले. ‘‘महाराष्ट्र भवनमुळे दोन्ही राज्यांतील पर्यटकांना फायदा होईल. त्यामुळे भवनाच्या उभारणीसाठी पुरेशी आणि योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी. जागा मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकार त्यांची उभारणी करून ते लवकर लोकांसाठी उपलब्ध करेल,’’ असेही शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.
काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवनाच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठविलेल्या प्रस्तावाचे स्वागत असून, महाराष्ट्रातही काश्मीर भवन उभारण्यात यावे, अशी मागणी सरहद संस्थेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे. ‘‘जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्राचे पर्यटक सर्वाधिक जातात. भवनासाठी रेल्वे आणि विमानतळापासून जवळ असलेली आमची पिढीजात जमीन मी देऊ केली आहे,’’ असे संस्थेचे झाहिद भट म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम