मुख्यमंत्री शिंदेंच्या डोळ्यात पाणी आले … केसरकरांचा गोप्यस्फोट !
दै. बातमीदार । २२ जानेवारी २०२३ । राज्यात शिंदे व ठाकरे गटात सुरु असलेला वाद आता येत्या तीन ते चार दिवसात लागणार असून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका हि केली आहे.
मंत्री केसरकर म्हणाले कि, तुम्हाला मुख्यमंत्रिपद हवंय का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना केली होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात अश्रू आले. एकनाथ शिंदे यांचा अपमान झाला. आपण शिवसेनेसाठी केलेल्या त्यागाची किंमत अशा रीतीने केली जात आहे याचे शिंदेंना वाईट वाटले, मुख्यमंत्रिपदासाठी कुणी काय केले?, याचा खुलासा येत्या 2-4 दिवसांत मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून करणार आहे, असा दावा यावेळी केसरकर यांनी केला.
दीपक केसरकर म्हणाले, राज्यसभेची निवडणूक हारल्यानंतर त्याचा जाब राष्ट्रवादीला विचारला गेला नाही. उलट शिंदे यांच्यावरील जबाबदारी काढून घेण्यात आली. तरुण आमदारांकडे जबाबदारी देण्यात आली. ते आमच्यावर नजर ठेवत आहेत कि काय असेच वाटत असे. ज्यांना कधी राजकारण माहित नव्हते ते मुल दादागिरी करत होते. आपला स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आपण काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर नको जायला आपण आपल्या मुळ युतीकडे जाऊया, ऐवढेच शिंदे साहेबांचे म्हणणे होते.
दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले, जे लोक झोपतात, ते स्वप्न बघतात. जे लोक काम करतात ते दिवसरात्र धावत राहतात. म्हणून आमचे मुख्यमंत्री झोपत नाहीत. रात्री दोन-अडीच वाजेपर्यंत काम करतात. आम्ही सकाळी 11 वाजता कार्यक्रम करणारे लोक नाहीत. आम्ही जनतेतले लोक आहोत. जनतेची सेवा करणारे लोक आहोत. म्हणून आम्ही बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहोत.
दीपक केसरकर म्हणाले, हिंदुस्थानवर जो प्रेम करतो, तो हिंदू आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. अशा बाळासाहेबांच्या स्वप्नांना जी काँग्रेस विरोध करत होती, त्यांना काश्मिरमध्ये जाऊन भेटणे बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा अपमान कुणीही केला नाही तो संजय राऊतांनी केला असे मला वाटते. त्यामुळेच जे लोक सत्तेसाठी काँग्रेसचे पाय धरतात, राष्ट्रवादीच्या मागे मागे धावतात, त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम