मुख्यमंत्री शिंदेंनी भूखंड घोटाळा बॉम्ब नाही तर काय आहे? राऊतांची टीका

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ डिसेंबर २०२२ । नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूखंड प्रकरणी सवाल केल्यानंतर फडणवीस त्यावर उत्तर दिले होते. तर आज संजय राऊत यांनी आज नागपुरातून फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा बॉम्ब नाही तर काय आहे? देवेंद्र फडणवीस यांना या घोटाळा वाटत नाही? हे गंभीर आहे. हे योग्य नाही. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्याकडून आम्हाला या अपेक्षा नाहीत, देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा होतेय. याच दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बॉम्ब वॉर सुरु आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे बॉम्ब असल्याचं म्हटलं आणि हे बॉम्ब आपण लवकरच फोडणार असल्याचं म्हटलं. त्यावर ठाकरे गटाकडे बॉम्ब नव्हे तर लवंगी फटाके असल्याचं म्हटलं. याला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम