मुख्यमंत्री शिंदेंचा अयोध्या दौरा निश्चित ; टीझर जारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ एप्रिल २०२३ ।  राज्यात भाजप व एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौऱ्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आज आखरे यावर पडदा पडला असून त्यांचा अयोध्या दौऱ्याचा पहिला टीझर जारी करण्यात आल्यानंतर आता दौरा निश्चित मानला जात आहे.

९ एप्रिल रोजी आपल्या 40 आमदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्याचा टीझर आता जारी करण्यात आला आहे. ‘अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ’, अशी टॅगलाईन असलेला हा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रात रामराज्य असल्याचे म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्र एक सुशासित राज्य आहे, असा दावा करण्यात आला आहे. टीझरमध्ये महाराष्ट्रात सामान्य जनता हा एक परिवार आहे तर जनतेची सेवा, मानव सेवा हेच परम कर्तव्य आहे, अशी एकनाथ शिंदेंची ओळख ठसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंदूत्व ठसवण्याचाही जोरदार प्रयत्न या टीझरमधून करण्यात आला आहे. ‘भगव्याला कधीही डावलले जाणार नाही, रग रग में राम, कण कण में राम’, अशा प्रकारे ओळी वापरण्यात आले आहेत. संपूर्ण हिंदी भाषेत हा टीझर आहे आणि सर्वात शेवटी ‘अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ’, असा शंखनाद करण्यात आला आहे. एकूणच शिंदेंचे हिंदुत्व ठसवण्याचा प्रयत्न टीझरमधून करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. शिवसेनेत फूट होण्यापूर्वी ते आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर शिवसेनेत झालेली उभ फूट अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. शिंदे यांचा हा अयोध्या दौरा एका सूनियोजित राजकीय रणनीतींतर्गत होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंच्या या नियोजित दौऱ्यात त्यांच्यासोबत शिवेसनेच्या सर्व आमदारांसह त्यांचे खासदार सुपूत्र श्रीकांत शिंदे असतील असा अंदाज आहे. गत महिन्याभरापासून शिंदे यांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम