लहान मुले स्टिक फास्ट या नशेच्या आहारी, जीवघेणा स्वस्तातला नशा

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतीनिधी

शहरातील काही लहान बालकांना स्टिक फास्ट पासून मिळणाऱ्या नशेची सवय होताना दिसून येत असून गरीब घरातील लहान मुले, शाळाबाह्य, तसेच भीक मागून, कचरा वेचून जीवन जगणाऱ्या लहान मुलांना या स्टीक फास्ट नशेची लकब मोठया प्रमाणावर दिसून येत आहे.

सहज उपलब्ध होणारा नशा
शहरातील काही छोट्या किराणा व्यवसायिकडे हे स्टिक फास्ट सहज उपलब्ध होत असल्याने व कमी पैशात जास्तीची नाश मिळतो यामुळे लहान मुले ही नशा करताना दिसून येतात.

 

या नशे साठी परिसरात केर कचरा जमा करून तसेच स्वतःची गरिबीचा देखावा करून भिक देखील मांगतात व या पैशातून नशेचे पदार्थ सोल्युशन ट्यूब (स्टिक फास्ट) हे विकत घेऊन प्लास्टिकच्या पिशवी टाकून त्याला खाली वर करतात यामुळे प्लास्टिक पिशवीत धूरा सारखी तयार होणारी वाफ सदरील मुले ही आपल्या नाकात व तोंडा द्वारे शोषून घेतात त्यामुळे त्यांना भयंकर अशी नशा होत असते. या नशा ने शहरात कोणत्याही ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी ही मंडळी निद्रावस्थेत आढळतात. सदरील नशा करणारे ही लहान मूल असून याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर काय होईल याची कल्पना सुद्धा त्यांना नसावी फक्त नशा आणि नशा साठी १०ते१५ रुपयात भेटत असलेली सोल्युशन ट्यूब म्हणजे कमी पैशात नशेचा भरपूर आनंद घेऊन आपले आयुष्य संपवीत आहे.

याविषयी शासनाच्या संबंधित यंत्रणेकडून तात्काळ योग्य ती दखल घेतली जावी. तसेच हे सोल्युशन ट्यूब कुठून उपलब्ध करतात याचीदेखील सखोल चौकशी व्हावी व ते नशेचे पदार्थ सोल्युशन ट्यूब ही लहान मुलांना उपलब्ध होऊ नये याची व्यावसायिकांना तंबी द्यावी अशी अपेक्षा सुजाण नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम