चिंचवड विधानसभा निवडणूक: “भाकरी” पलटण्याची वेळ!
विधानसभेसाठी महायुती ने 'खान्देशी' उमेदवारच द्यावा- माऊली जगताप युवासेना शहरप्रमुख पिंपरी चिंचवड भोसरी
राज्यात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक २०२४ साठी महायुती च्या उमेदवारांच्या निवडीची तयारी सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील युवासेना शहरप्रमुख माऊली जगताप यांनी महायुतीकडून चिंचवड विधानसभेसाठी “खान्देशी उमेदवार” असावा, अशी मागणी केली आहे.
चिंचवड मतदारसंघ (२०५) हा पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. यंदा साडे सहा लाखांहून अधिक मतदार संख्या असल्याने महायुतीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, रावेत अशा प्रमुख उपनगरांमध्ये खान्देशी उमेदवार च्या निवडीबाबत विशेष चर्चा सुरू आहे, कारण येथील खान्देशी समाज १६६,००० पेक्षा जास्त मतदारांचा समावेश आहे.
माऊली जगताप यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे मतदार जागृती अभियान सुरू आहे. प्रत्येक मतदारसंघात वॉर्डस्तरीय बैठकी आयोजित केल्या जात असून, युवासेनेचे सर्व विभागीय पदाधिकारी या अभियानासाठी कार्यरत आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण करता, विजयी उमेदवारास १,३६,६३० मते मिळाली होती, म्हणजेच एकूण मतदानापैकी ४७% मते. या वेळी, खान्देशी उमेदवार योग्य नियोजनाने अधिकाधिक मतदारांना आकर्षित करू शकतो.
चिंचवड मतदारसंघातील खान्देशी समाजाच्या मतदारांची संख्या पाहता, महायुतीने यंदाच्या निवडणुकीत खान्देशी उमेदवार द्यावा, अशी मागणी माऊली जगताप यांनी केली आहे. युवासेनेचे शिष्टमंडळ लवकरच खासदार श्रीरंग बारणे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम