चिंचवड पोटनिवडणूकित तिरंगी लढत कायम !
दै. बातमीदार । १० फेब्रुवारी २०२३ । राज्यात सर्वत्र चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुक होय. त्यासाठी आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी दि. १० रोजी महाविकास आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा अर्ज कायम राहिला. त्यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये पाच जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता रिंगणात २८ उमेदवार राहिले आहेत.भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॅांग्रेसचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.
या निवडणुकीत ४० पैकी ३३ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले होते. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या कालावधीत पाच जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार राहिले आहेत. आज अर्ज माघे घेतलेले उमेदवारांमध्ये राजेंद्र मारूती काटे, भाऊसाहेब रामचंद्र अडागळे, संभाजी ब्रिगेडचे प्रविण अशोक कदम, अॅड. मनिषा मनोहर कारंडे, रविंद्र पारधे (सर) यांचा समावेश आहे.
जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन आहेर आज सकाळी कलाटेंना वाकड येथील त्यांच्या कार्यालयात भेटले. बंद दाराआड चर्चा करताना उध्दव ठाकरे यांचे मोबाईलवरून कलाटेंशी बोलने झाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॅांग्रंसचे स्थानिक नेते योगेश बहल व मोरेश्वर भोंडवे यांनी कलाटे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान कलाटे राष्ट्रवादीचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष किशोर भेगडेंबरोबर अज्ञात स्थळी रवाना झाले.
दुपारी पावणे तीनच्या सुमारास वाकड येथील कार्यालयात आले. तत्पुर्वी पाच मिनीटे आधी माजी आमदार विलास लांडे, संजोग वाघेरे कलाटे यांच्या कार्यालयाजवळ आले होते. त्यांनीही शवटचा शिष्टाईचा प्रयत्न केला. पण, ही शिष्टाईही असफल ठरली. अखेर तीन वाजता पत्रकारांसमोर येऊन कलाटे यांनी आपण निवडणुक लढवित असल्याचे जाहिर केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम