उर्फीवर पुन्हा चित्रा वाघ बरसल्या..म्हणाल्या नांगनाच…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जानेवारी २०२३ गेल्या काही दिवसापासून राजकीय महिला नेत्या व अभिनेत्रीचा वाद राज्यात पाहायला मिळत आहे. यावर दोन्ही नेत्या व एक अभिनेत्री एकमेकावर आरोप – प्रत्यारोप करीत आहे. यात आता चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत अभिनेत्री उपाय सांगत चांगलाच समाचार घेतला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या कि, आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू, असा इशाराच चित्रा वाघ यांनी दिला आहे. चित्रा वाघ यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन उर्फीला डिवचलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वैराचार नाही. फॅशन व नांगनाच यात फार फरक आहे. ऐकलं तर ठीक. नाही तर आम्ही सगळ्या अलर्जीवर उपचार करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

एका आईने मला एसएमस पाठवला होता. त्यामुळे मी उर्फी विषयावर बोलले. मुली कोणाचा आदर्श घेणार? महाराष्ट्रात हे चालणार नाही. आधी कपडे घाला. मग ठरवा, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम