चोपड्यात ग्रंथोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन
चोपडा ;- जिल्हा ग्रंथालय, नगर वाचन मंदिर व अमर संस्था संचालित ग्रंथालय चोपडा यांच्या सयुक्त विद्यमाने दि.1 व 2 मार्च २०२4 रोजी ग्रंथोत्सव यानिमित्ताने ग्रंथप्रदर्शन व विक्री आणि साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ग्रंथदिंडी पूजन आमदार सौ. लताताई सोनवणे व माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी याच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास आणि पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन तर कार्यक्रमाचे उदघाटन पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालक मंत्री गुलाबराव पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिति लाभणार आहे
1 मार्च रोजी दुपारी 3ते5 दरम्यान आभासी शिक्षण विद्यार्थीसाठी एक पर्वणी प्रात्यक्षिकासह सादरकर्ते सिध्देश गायकवाड मॅनेजिंग डायरेक्टर मुबंई तसेच 5 वाजता छत्रपती शिवाजी राजे व जीवनातील अध्यामिक अधिष्ठान सादरकर्ते मयुर देशमुख नाशिक 2 मार्च रोजी 11ते 1अवकाशावर बोलु काही या व्याख्यान सादरकर्ते विजयसिंग पवार खगोलशास्त्र 3 ते 5 मन करा रे प्रसन्न यशाचे कारण सादरकर्ते डॉ. शरद अकोले पुणे तसेच तालुक्यातील 15 ते 20 शाळेतील विद्यार्थी विविध नाटक सादर करणार आहेत तालुक्यातील 44 ग्रंथालय व जिल्हातील 411 ग्रंथालय वरील कार्यक्रमात सहभागी होणार असुन हा ग्रंथोत्सव दरवर्षी जिल्हा स्तरावर राबविण्यात येत होता परंतु शासनाने हा कार्यक्रम आता दरवर्षी तालुका पातळीवर घेण्याच्या निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील लोकांना वाचनाकडे ओढ निर्माण होईल अशी माहिती बाल मोहन विद्यालयात घेण्यात आलेली पत्रकार परिषदेत जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी दिली यावेळी अमर संस्थाचे चेअरमन चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम