माजी आ.चंद्रकात सोनवणे यांनी केली पिकांची नुकसान पाहणी
बातमीदार l बुधवार दि. २८ फेब्रुवारी २०२४
चोपडा अवकाळी पावसाने चोपडा तालुक्यात वादळी वारेसह गांराचा पावसाने तालुक्या भरात शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे फार मोठे नुकसान झाल्यामुळे दि.२७रोजी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पाहणी केली.
यावेळी प्रांतधिकारी अमळनेर .महादेव खेडकर व तहसिलदार भाऊसाहेब थोरात व कृषीअधिकारी श्री सांळुखे तसेच सर्व कृषी सहाय्यक तलाठीसह अधिकारीच्या ताफ्यासह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची बांधावर जावुन प्रत्यक्ष पाहणी केली असता नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
तसेच संबधित प्रभागातील कृषीसहाय्यक व तलाठीनां २४तासात पंचनामे करुन तलाठी आॕफीस व ग्रामपंचायतीचे लावण्याचे सांगितले . ज्यांचे पीकांचे नुकसान झाले असेल त्यांनी आॕनलाईन तक्रार नोदंणी करावी व आॕनलाईन साठी काही अडचण असेल तर आॕफलाईन अर्ज स्विकारण्याचे निर्देश संबधित विमा कंपनीला यांना दिले.
सर्व तलाठी व कृषी सहाय्यक संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले .त्याप्रंसगी अमळनेर प्रांतधिकारी महादेव खेडकर .तहसिलदार भाऊसाहेब थोरात .सांळुखे साहेब कृषीअधिकारी कृउबा सभापती नरेद्र पाटील संचालक शिवराज पाटील विजय पाटील रावसाहेब पाटील गोपाल पाटील किरण देवराज राजेद्र पाटील पप्पु भारडु नाना अहीरे प्रताप पाटील नितीन पाटील व अवकाळी पावसने नुकसान झालेले शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम