
गुळ प्रकल्पातून उजव्या-डाव्या कालव्याला पाणीपुरवठा; शेतकऱ्यांत समाधान
आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश
गुळ प्रकल्पातून उजव्या-डाव्या कालव्याला पाणीपुरवठा; शेतकऱ्यांत समाधान
आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश
चोपडा: यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या सूचनेनुसार गुळ प्रकल्पातील उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गुळ परिसरातील गावांच्या शेतीसाठी आणि विहिरींच्या पुनर्भरणासाठी मोठा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे
१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी कालव्याला पाणी सोडण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक गोपाल पाटील, विजय पाटील, किरण देवराज, कार्यकारी अभियंता उत्तमराव दाभाडे, उपविभागीय अभियंता भरत ओंबळे आणि आर. टी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गणेश पाटील, कुणाल पाटील, दीपक चौधरी, प्रदीप बारी, प्रल्हाद कोळी, प्रताप पाटील, प्रवीण पाटील, दीपक माळी, श्रीकांत पाटील, रवींद्र पाटील, भगवत कोळी, भगवान कोळी, सुभाष चव्हाण, दत्तात्रय पाटील, रामलाल पावरा, संजय कोळी, महारू कोळी, किरण ठाकूर, भाईजी राजपूत, प्रदीप राजपूत, प्रकाश भाऊ, भिका पाटील, विठ्ठल कोळी, अमोल शेटे, पिंटू इंगळे, सतीलाल धनगर, गजेंद्र पाटील, नंदलाल पाटील, दीपक कोळी, रवींद्र पाटील आणि विशाल धनगर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम