जिभाऊ स्वर्गवासी तुकाराम पाटील यांच्या 46 व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली ..!

बातमी शेअर करा...

जिभाऊ स्वर्गवासी तुकाराम पाटील यांच्या 46 व्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली ..!
चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील आडगाव येथील जुन्या पिढीचे नेते, स्व. जिभाऊ तुकाराम पाटील यांना त्यांच्या 46 व्या स्मृतिप्रित्यर्थ भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यात आली.
गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत येथे त्यांच्या तैल चित्रास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
1956 सालापासून जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करताना जिभाऊंनी काँग्रेस पक्षाचे माध्यमातून मार्केट कमिटी, पंचायत समिती, शेतकी संघ, आदी संस्थांच्या माध्यमातून समाज हिताचे व लोकहिताचे राजकारण केले. असे आपल्या प्रास्ताविकात कवी रमेश पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रारंभी सरपंच सौ .भारती भिल, उपसरपंच प्रताप पाटील, चो.सा. का. संचालक,माजी चेअरमन पंडित रामदास पाटील यांनी फोटो पूजन केले. ग्रामपंचायत, विकास सोसायटी, येथेही जिभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गावातील-शेतकी संघाचे प्रेसिडेंट-सुनील पाटील,अंबादास पाटील, रावसाहेब पाटील, ताराचंद पाटील, रघुनाथ पाटील, शेतकी संघाचे संचालक-शामकांत भागवत पाटील, नामदेव माळी, भिवसन चांभार, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, भोमा पाटील, व गावातील सर्वच प्रतिष्ठित ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम