
जळगाव शहरातून बांधकाम साहित्याची चोरी
जळगाव शहरातून बांधकाम साहित्याची चोरी
जळगाव – शहरातील रिंगरोड परिसरातील काबरा तथास्तू इमारत प्रकल्पाच्या बांधकामस्थळी ठेवलेल्या लोखंडी प्लेटांची चोरी झाल्याचा प्रकार रविवारी, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. एकूण ५१ हजार रुपये किंमतीच्या १७ प्लेटा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने ठेकेदारांसह बांधकामस्थळी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोमवारी, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोडवरील काबरा तथास्तू बिल्डिंगचे बांधकाम सुरू असून बांधकामासाठी लागणारे साहित्य तिथेच साठवून ठेवण्यात आले आहे. यामध्ये वापरासाठी असलेल्या लोखंडी प्लेटा देखील स्वतंत्रपणे ठेवण्यात आल्या होत्या. मात्र २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधून १६ ते १७ प्लेटा चोरून नेल्या. रविवारी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार वॉचमन गुड्डू पांडे यांच्या निदर्शनास आला.
यानंतर पांडे यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत पोहेकॉ रवींद्र ठाकरे यांच्याकडे पुढील तपास सोपवला आहे. पोलिसांकडून बांधकाम परिसरातील हालचाली, सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची माहिती तपासत चोरीबाबतचा शोध घेतला जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम