
सोन्याच्या किमतीने नागरिकांना बसला मोठा फटका !
दै. बातमीदार । १२ एप्रिल २०२३ । राज्यात एप्रिल महिना उलटला आहे तर दुसरीकडे ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या किमतींनी साठी गाठल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. सोन्याची वाढते दर पाहता अनेकांनी सोने खरेदी थांबवल आहे. याचा फटका देखील आता मार्केटमध्ये अनेकांना बसत आहे. परिणामी 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 55,700 रुपये आहे. तर चांदी 76,600 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. यामध्ये उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती संपूर्ण भारतात बदलतात. त्यामुळे सोने खरेदी करताना जास्त घाई करु नका…
सोन्याचे दर गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत चालले आहे. यावेळी सोन्याने नवीन विक्रम केला आहे. 5 एप्रिलला सार्वाधिक सोन्याचे दर बघायला मिळाले आहेत. त्यामुळे जगातील मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. आज जाहिर झालेल्या सोन्या दरात किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 55,700 रुपये आहे.
तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,760 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम दर 55,700 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 60,760 रुपये असेल. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 55,700 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 60,760 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 55,730 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमचा दर 60,760 रुपये आहे. तर चांदी आज प्रति 10 ग्रॅमनुसार 766 रुपयांनी विकली जाणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम