शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना नारळ ? हायकमांडकडून आदेश !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जून २०२३ ।  राज्यात गेल्या काही दिवसापासून शिंदेसेना आणि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र नेहमी दिसून येत असताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात समाधानकारक काम न करणाऱ्या शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची माहिती समोर येत असून, याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त दिले आहे. तसेच या पाचही मंत्र्यांच्या जागी नवीन लोकांना संधी देण्याचे देखील आदेशात म्हटले आहे. ज्यात रोहयो मंत्री संदिपान भुमरे , कृषीमंत्री अब्दुल सत्तार , आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील अन्न वं औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पाहायला मिळत आहे. यासाठी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका देखील झाल्या असल्याची चर्चा आहे. असे असताना सद्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांच्या कामकाजावर भाजपचे दिल्लीतील नेते नाखूष असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना मंत्रीपदावरून हटवून त्यांच्याजागी इतर आमदारांची निवड करण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत सापडले असल्याचं पाहायला मिळत आहे.
शिंदे गटातील पाच मंत्र्यांना हटवण्याचे आदेश भाजपच्या हायकमांडकडून देण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवेळी आपल्याला साथ देणाऱ्या लोकांना आता मंत्रीपदावरून कसे हटवावे असा प्रश्न शिंदे यांना पडला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे तीन दिवस अज्ञातवासात गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम