मुंबईसह राज्यात थंडी कायम, काही भागात दिलासा, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

बातमी शेअर करा...

बातमीदार । २५ जानेवारी २०२३ । राज्यात थंडीचा जोर कायम आहे. परंतु, काही भागात किंचित थंडी कमी झाली आहे. त्यामुळे काही भागात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही भागात अझुनही हुडहुडी कायम आहे. उद्यापर्यंत म्हणजे २६ जानेवारीपर्यंत थंडी वाढणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला होता. पाहुयात कोणत्या जिल्ह्याती किती तापमानाची नोंद झाली…

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर भारतात थंडी अद्यापही कायम आहे. राज्यातील इतर भागात थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

कुठे किती तापमान?
(अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई (सांताक्रुज) १५.६
पुणे १३.५
सातारा १८.२
कोल्हापूर १८.८
नवी मुंबई १९
नांदेड १८.८
उदगीर १८.५
कुलाबा १७.६
सोलापूर २०.९
परभणी १७.४
बारामती १६.९
महाबळेश्वर १४.९
डहाणू १६
जळगाव १६.४
उस्मानाबाद १८.४
रत्नागिरी १९.८
माथेरान १२.४
जालना १६.६
औरंगाबाद १३.२
नाशिक १२.६

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम