जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन

बातमी शेअर करा...

 

 

औरंगाबाद दि. २४ ऑगस्ट | कॉमनवेल्थ फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये औरंगाबादच्या कशीश भरड, बुलडाण्याच्या गौरी साळुंखे यांनी 17 वर्षाखालील कॅडेट गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत सेबर सांघिक प्रकारात कांस्यपदक पटकावून तर ज्ञानेश्वरी शिंदे (लातूर) हिने ज्युनिअर गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत इपी सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावत भारताचे नाव उज्वल केले आहे. या सर्वांचे आज औरंगाबाद विमानतळ येथे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कौतुक करत अभिनंदन केले.

सर्व खेळाडूंचे औरंगाबाद विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, उपाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जिल्हा संघटनेचे सहसचिव डॉ. दिनेश वंजारे, स्वप्निल तांगडे, सागर मगरे, अजय त्रिभुवन यांच्यासह अनेक तलवारबाजी खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व पालकांची उपस्थिती होती.

औरंगाबादच्या श्रेयस जाधव यांनी देखील ज्युनिअर गटात भारताचे प्रतिनिधित्व करीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. भारतीय संघासोबत साई क्रीडा केंद्राचे तलवारबाजी प्रशिक्षक तुकाराम मेहत्रा सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अजय त्रिभुवन, तुकाराम मेहत्रा, श्रेया सिंग व शिल्पा नेने यांचे मार्गदर्शन लाभल्याचे डॉ. डोंगरे यांनी सांगितले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम