
स्तुत्य उपक्रम : जळगावात ५० किलो साबुदाणा खिचडीचे वाटप !
जळगाव मिरर / १८ फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावासह शहरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. जळगाव शहरातील महाबळ परिसरातही महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ५० किलो खिचडीसह दुध व केळीचे वाटप करण्यात आले.
सामाजीक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेले योगेश जोशी व भगवान उमरे (बिलवाडीकर) यांनी दरवर्षीप्रमाणे या यंदाही महाबळ रोडवरील मायादेवी मंदीरा समोर ५० किलो साबुदाणा खिचडीचे, दुध व केळीचे वाटप करण्यात आले. तसेच सदराचा कार्यक्रम यशस्वीरित्या पारपाडणेसाठी योगेश रंधे, किरण नलगे, गणेश सोनवणे, दर्शन पाटील, मयुर लोहरे, दिलीप दांडगे, कैलास पवार, शेखर पाटील, गौरव नलगे, कांती लोहार( महाराज) व दिलीप विसपुते इत्यादींनी सहकार्य केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम