‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांना मातृशोक !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ मार्च २०२३ । राज्यातील प्रत्येक घरापर्यत पोहचलेली मालिका म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ या नाटकात आपल्या विदर्भ भाषेतून सर्वाना हसविणारे भारत गणेशपुरे यांच्या मातोश्री मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे आज दिनांक ९ मार्च २०२३ रोजी पहाटे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे ४.३० निधन झाले. अमरावतीमधल्या राहत्या घरी त्यांनी श्वेटचा श्वास घेतला. गुरुवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ५.३० वाजता रहाटगाव येथील मुक्तगड सान्वी बिल्डींग या निवासस्थानातून निघणार आहे.

मनाेरमाबाई यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार अमरावती येथील दिशा फांऊडेशनने मृत्युपश्चात नेत्रदानाची प्रक्रिया सकाळीच पार पडली. मनोरमाबाई यांना एकूण चार अपत्ये होती. त्यापैकी एक मुलगा, एका मुलीचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात भारत, मनीष ही दोन मुले, स्नुषा नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. मराठी कलाविश्वातील दिग्गज विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे भारत गणेशपुरे. गेली अनेक वर्षे ‘झी’ मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. भारत गणेशपुरे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम