विद्यार्थ्यांसाठी माईंड जिम आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्प्यूटराईज यंत्र चाचण्यांचे आयोजन

पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था व मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांचा स्तुत्य उपक्रम

बातमी शेअर करा...

चोपडा / प्रतिनिधी

आपल्या यशस्वी जीवनात येणारे अडथळे दूर करत आपल्या क्षमतांच्या परिपूर्ण वापर कसा करता येईल याबाबत शास्त्रीय पद्धतीने खास विद्यार्थी व पालकांसाठी दि. ४ ते ८ डिसेंबर २०२३ दरम्यान विविध चाचण्या व मार्गदर्शनाचे आयोजन पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था मार्फत करण्यात आले आहे.

सर्व चाचण्या मनाच्या पातळीवर घेतल्या जाणार आहेत.मनाची एकाग्रता, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, तत्परता, स्थिरता, निर्णयक्षमता आदींच्या विकासासाठी उपयुक्त अशा ह्या चाचण्या आहेत.

या शिबिरात एकूण ६ प्रकारच्या चाचण्या घेण्यात येणार आहे. त्यात १.अभ्यास ताण मापन चाचणी, २.मेंदू क्षमता मापन चाचणी, ३. स्थिरता चाचणी, ४. मेंदू बलवता चाचणी, ५. नैराश्य, चिंता ताण मापक चाचणी, ६. व्यक्तिमत्व मापक रंग चाचणी इत्यादी चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

मन:शक्ती प्रयोग केंद्र’ ही एक आद्य आणि अग्रगण्य अशी मनावर संशोधन करणारी भारतातील एकमेव संस्था आहे. जी संस्था लोणावळा ( पुणे ) येथे कार्यरत आहे.

सुखी जीवनासाठी विज्ञानशुद्ध, बुद्धिनिष्ठ पद्धतीचे उपाय, पाच भाषांतील अडीचशेच्या वर पुस्तके, बालसंस्कार, शिक्षक सक्षमीकरण, पालक प्रौढांसाठी विविध अभ्यासवर्ग, तारुण्य धैर्य मार्गदर्शन, ६० प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स यंत्रांच्या आधारे कम्प्युटराइज्ड चाचण्या, ग्रामीण व आदिवासींसाठी विविध सेवा उपक्रम सातत्याने मनशक्ती केंद्रात चालू असतात.
अभ्यासवर्ग, शिबिरे, कार्यशाळा, मेंदूशास्त्र आधारित मानस चाचण्या अशा विविध माध्यमांतून विद्यार्थी, तरुण, प्रौढ व वृद्ध यांनी आपला सहभाग मोठ्या संख्येने नोंदविला आहे.

पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांनी मनशक्ती केंद्र लोणावळा येथे स्वतः शिबिराचा लाभ घेतला आहे आणि आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मनशक्ती केंद्र लोणावळा यांना आमंत्रित करून विद्यार्थी व पालक हितासाठी सदर शिबिराचे आयोजन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम