राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गोंधळ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ ऑगस्ट २०२३ | कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल झाल्यानंतर आज पहिल्यांदा लोकसभेच्या संसदेत बोलले असता. यावेळी राहुल गांधी म्हणाले गेल्यावेळी अदानींचा मुद्दा जोरात मांडल्यामुळे भाजपच्या लोकांना त्रास झाला. आता त्यांना त्रास होणार नाही. मला पुन्हा खासदारकी बहाल केल्याबद्दल धन्यवाद. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेतील अनुभव सांगितले. तसेच मोदी सरकारवर मणिपूर मुद्द्यांवर चौफेर टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, “माझे भाषण आज अदानींवर नाही त्यामुळे भाजप नेत्यांनी काळजी करुन नये. जो शब्द दिलसे आते है ,वो दिल मे जाते है, आज दिमाग से नही दिलसे बोलुंगा. सत्ताधारी पक्ष शांत राहू शकतात. मी टोला मारणार नाही पण एक-दोन टोले नक्की लगावणार” राहुल गांधी म्हणाले, “मी भारतात एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात प्रवास केला. समुद्र किनाऱ्यापासून काश्मीरपर्यंत मी प्रवास केला. मला अनेकांनी विचारले तुम्ही का चालत आहात? तर माझ्याकडे उत्तर नव्हते. कारण मलाच माहित नव्हते मी यात्रा का सुरू केली. मला नंतर कळाले मी ज्या गोष्टींवर मला प्रेम होते. ज्या गोष्टीसाठी मी मोदीजींच्या कारागृहात जायला तयार आहे. ती गोष्ट मला समजून घ्यायची होती. मला भारत समजून घ्यायचा होता.

“जशी मी यात्रा सुरू केली. मला वाटलं मी २५ किलोमीटर सहज चालू शकतो. हा माझा अहंकार होता. मात्र भारताने तो नष्ट केला. देश समजून घ्यायला मी यात्रा काढली. दोन दिवसात मला घुडग्याचा त्रास झाला. प्रत्येक पावलावर मला त्रास झाला. जो भारत पाहण्यासाठी मी अहंकारी रुपात निघालो होतो. तो नष्ट झाला. चालतांना मला त्रास झाला तेव्हा कोणतीतरी शक्ती मला पाठिंबा द्यायची. मला एका ८ वर्षाच्या मुलीने मला चिठ्ठी दिली. की मी तुमच्याबरोबर चालणार,” असे राहुल गांधी म्हणाले. “माझ्या जवळ एक शेतकरी आला. त्याच्या हातात कापूस होता. तो म्हणाला, राहुलजी हेच वाचले आहे. बाकी काही नाही. विम्याचे पैसे मिळाले का मी विचारले तर शेतकरी म्हणाले. भारतातील उद्योगपतींना पैसे गेले मला मिळाले नाही. त्याची भूक मला कळाली. यानंतर यात्रेचे स्वरुप बदलले”, असे राहुल गांधी म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम