कसब्यात कॉंग्रेसला सापडला विजय : धंगेकरांना ७२ हजारांनी मिळवले यश !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ मार्च २०२३ । गेल्या कित्येक वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. धंगेकरांना ७२ हजार ५९९ तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळाली आहेत. साधारण १० हजार ८०० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत.

खरंतर कसबा पेठ निवडणूक दोन्ही पक्षांसाठी रंगीत प्रतिष्ठेची झाली होती. कसबा हा भाजपला बालेकिल्ला समजला जात असला तरी पेठेतल्या मतदारांनी भाजपला नाकारलं आहे. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कसब्यात ठाण मांडून होते. रात्री-अपरात्री त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील प्रचारादरम्यान पुणे दौऱ्यावर होते. ही निवडणूक २०२४ विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजली जाते. कसब्यातून काँग्रेसला परवलीचा मुद्दा सापडलाय का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक उमेदवार आणि स्थानिक मुद्दे घेऊन कसब्याची निवडणूक झाली. शिवाय रवींद्र धंगेकर यांचं ग्राऊंड लेव्हलवरील काम, त्यांचा साधेपणा; हे मुद्दे काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या कामी आले आहेत. काँग्रेसला धंगेकरांच्या माध्यमातून विजयाचा सूर गवसू शकतो, असंही राजकीय जाणकार सांगतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम