कॉंग्रेसने पुणे निवडणुकीत उमेदवार केला जाहीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० मे २०२३ ।  राज्यातील पुणे येथील भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून सध्या दावे-प्रतिदावे केले जात आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे वारंवार उमेदवार पराभूत होत आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यात यावी, असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. तर काॅंग्रेसकडून या जागेसाठी आता आपला उमेदवारही घोषीत करून दिल्याने एकच चर्चा रंगली आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेस सुरू आहे. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमध्ये या जागेवरून दावे ठोकले जात आहेत. तर काॅंग्रेसकडून आता या निवडणुकीसाठी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे आगामी या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येणार आहे. ? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.

दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात आमदार रविंद्र धंगेकरांना काॅंग्रेस रिंगणात उतरवण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धंगेकरांना तयारीचे आदेशही दिले आहे. त्यामुळे एकिकडे पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला असतानाच दुसरीकडे मात्र काॅंग्रेसने उमेदवार निश्चित केल्याने एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम