
कॉंग्रेस नेते गांधी यांनी सांगीतला ‘पप्पू’ चा अर्थ
दै. बातमीदार । २९ डिसेंबर २०२२ । देशातील सर्वच विरोधक कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर तुफान टीका नेहमी करीत असता पण त्याला राहुलहे जास्त महत्व देत नाही तर अनेक नेत्यांच्या नावामध्ये सर्वात कॉमेडी नाव म्हणून चिडवणार नाव म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी. जवळपास सर्वच पक्षाचे राजकीय नेते आणि समर्थक ‘पप्पू’ म्हणतात.
राहुल गांधींना कित्येकदा ‘पप्पू’ म्हणत, सोशल मीडियावर ट्रोल करतात. यावरच भारत जोडो यात्रेमध्ये घेतलेल्या एका मुलाखतीत यासंबंधी राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मला या नावासंदर्भात काहीच अडचण नाही. पूर्वी माझ्या आजीला (इंदिरा गांधी) सुद्धा गुंगी गुडिया म्हणत होते आणि आज त्यांनाच आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं असं राहुल गांधी म्हणाले आहेत.’द बॉम्बे जर्नी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “राजकारणात एकमेकांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारणं हा प्रचाराचा एक भाग आहे. मला आज जे पप्पू म्हणत आहेत ते खरं तर मला आतून घाबरतात. मला कोणत्याही नावानं हाक मारायला हरकत नाही. मी त्या नावाचं स्वागतच करिन” असंही गांधी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम