दै. बातमीदार । २७ डिसेंबर २०२२ । देशात गेल्या काही महिन्यापासून राजकीय नेते करीत असलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापत असतांना नेहमी दिसून येते पण तरीसुद्धा राजकीय नेते आपले वक्तव्य थांबविण्याचे नाव घेतच नाही, नुकतेच माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांची तुलना भगवान श्रीरामाशी केलीये. प्रभू राम सर्वत्र जाऊ शकत नाहीत. मात्र, त्यांचा काफिला खूप दूरवर जातो, असं त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलंय.
प्रभू रामाची भूमिका घेऊन आम्ही (काँग्रेस) चालत आहोत. हा काफिला आता उत्तर प्रदेशात आला आहे, त्यामुळं रामही येणार आहे. राहुल गांधी योगीप्रमाणं तपश्चर्या करत आहेत, असंही खुर्शीद यांनी सांगितलं. यूपीच्या मुरादाबाद सर्किट हाऊसमध्ये काँग्रेस नेते खुर्शीद पुढं म्हणाले, ‘भाजप द्वेष पसरवून देश तोडण्याचं काम करत आहे. देशाची मानसिकता मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे. राहुल गांधी सुपर ह्युमन आहेत. कडाक्याच्या थंडीत ते टी-शर्ट घालूनच बाहेर पडतात.’ दरम्यान, खुर्शीद कोविडचं संकट वाढण्याच्या आणि मास्क घालण्याच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी पत्रकारांवरच भडकले. ते म्हणाले, तुमच्यापैकी फक्त एकानंच मास्क घातला आहे. भाजपचं म्हणणं का मान्य करायचं? आमचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही कोरोनाबाबत इशारा दिला होता; पण त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम