पोटनिवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला बसणार मोठा धक्का !
दै. बातमीदार । ६ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील सर्वात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे पुण्यातील पोटनिवडणुक. त्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी इतर पक्ष आणि भाजप वारंवार बैठका घेताना दिसून येत आहेत. अशातच, या निवडणुकांपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका लवकर पार पडणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात रविवारी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नगरसेवक रशीद शेख यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेख यांच्या प्रवेशाला माजी मंत्रीपुत्र बागवे यांचा तीव्र विरोध होता. मात्र, त्यांच्या नकळत या सर्व घडामोडी घडल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र माजी नगरसेवक अविनाश बागवे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.
रशीद शेख यांचा मुस्लिम समाजात चांगला प्रभाव आहे. त्याचा फटका रमेश बागवे यांना 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत झाला. या निवडणुकीत बागवे यांचा सुमारे साडेपाच हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे शेख यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यास बागवे यांचा विरोध होता. त्यामुळे बागवे यांना आधी कसलीच कल्पना न देता थेट काँग्रेस भवनात पटोले यांच्या उपस्थितीत शेख यांना प्रवेश देण्यात आला. ज्या रशीद शेख यांच्यामुळे 2019 च्या निवडणुकीत बागवे यांचा साडेपाच हजार मतांनी पराभव झाला त्यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका बागवे यांनी घेतली. मात्र ऐनवेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि प्रवेश घेण्यात आला. बागवे हे केली सुमारे पाच वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते. बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे हेदेखील तीन टर्म काँग्रेसचे नगरसेवक आहेत. शेख यांच्या प्रवेशाने नाराज झालेल्या बागवे पिता-पुत्रांची नाराजी समजतात भाजपकडून अविनाश बागवे यांना तातडीने आज संपर्क करण्यात आला.
दुसरीकडे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री नाना पटोले तसेच अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम होता. या ठिकाणीदेखील रमेश बागवे यांना बोलवण्यात आले. मात्र, त्यांनी तेथे जाण्याचे टाळले. त्यांना फोन करून बोलवण्यात आले. मात्र बागवे यांनी प्रतिसाद दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बागवे भाजपच्या वाटेवर जाण्याची तीव्र शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम