कॉंग्रेसने शिव्यांच्या देण्यापेक्षा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला असता ; पंतप्रधान मोदी !
दै. बातमीदार । २९ एप्रिल २०२३ । देशातील कर्नाटकात मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा शनिवारी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत.
यावेळी त्यांनी कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथे पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ‘काँग्रेसच्या लोकांनी मला आतापर्यंत मला 91 वेळा वेगवेगळ्या शिव्या दिल्या आहेत. शिव्यांच्या डिक्शनरीवर वेळ वाया घालवण्याऐवजी त्यांनी एवढी मेहनत त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी घेतली असती तर त्यांची आज हि अवस्था नसती’, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.
यावेळी पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करताना म्हणाले की, “कर्नाटकची ही निवडणूक केवळ 5 वर्षे सरकार स्थापन करण्यासाठी नाही, तर कर्नाटकला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्याची निवडणूक आहे. विकसित भारतासाठी कर्नाटकची प्रमुख भूमिका ठरविण्याची ही निवडणूक आहे. जेव्हा कर्नाटकच्या प्रत्येक कोपऱ्याचा विकास होईल तेव्हाच भारताचा विकास होईल. ही निवडणूक केवळ जिंकण्यापुरती नाही, तर ती कर्नाटकला देशातील नंबर 1 राज्य बनवण्याची आहे. राज्याचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा सर्व क्षेत्रांचा विकास होईल. ही निवडणूक राज्याची भूमिका ठरवेल.”
पुढे कॉँग्रेसवर टीका करत पीएम मोदी म्हणाले की, “भाजपच्या या सेवाकार्यांमध्ये काँग्रेसने समाजात फूट पाडली. जात, धर्म, पंथ या आधारावर विभागले गेले आणि शासनाच्या नावाखाली केवळ तुष्टीकरणाला प्रोत्साहन दिले आहे. काँग्रेसला गरिबांच्या समस्या कधीच समजल्या नाहीत, गरिबी पाहिली नाही. काँग्रेस हा असा पक्ष आहे जो विकासातही राजकारण करून अडथळे निर्माण करतो. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असेपर्यंत गरीबांसाठी घरे बांधण्याची गती मंदावली होती. मात्र दुहेरी इंजिन सरकार स्थापन झाल्यानंतर कर्नाटकातील गरिबांना सुमारे 9 लाखांची पक्की घरे मिळतील, असा निर्णय घेण्यात आला. भाजपने बिदरमध्ये सुमारे 30 हजार घरे बांधली, म्हणजेच बिदरच्या 30 हजार बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवले. भाजपने करोडो माता-भगिनींची बँक खाती उघडली, सरकारी मदत थेट त्यांच्यापर्यंत पोहोचली, विना हमी मुद्रा कर्जाची व्यवस्था केली, मोफत रेशनची व्यवस्था देखील भाजपने केल्याचे मोदी म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम