ठाकरेंना जीवे ठार मारण्याचा कट ; माजी पीएने केला धक्कादायक खुलासा !
दै. बातमीदार । २८ डिसेंबर २०२२ । राज्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जिल्ह्यात दौरे करीत असतांना त्यांना जीवे ठार मारण्याचा कट रचण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद वारंवार त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात परंतु यावेळी त्यांच्यावर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी सय्यद यांच्यावर हे गंभीर आरोप केले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी हे आरोप केले आहे.
त्याचबरोबर दीपाली सय्यद ट्रस्टतर्फे होणारे व्यवहार चुकीचे आहेत असंही म्हंटलं आहे. शिंदे यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तर भाऊसाहेब शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले होते. पुरस्कारामध्ये यावेळी 50 लोकांना 50 हजारांचे धनादेश देण्यात आले होते. पुरस्कारात देण्यात आलेले चेक बनावट असल्याचाही आरोप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम