मेंदूला चालना देण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० डिसेंबर २०२२ । नेहमी आपण आपली काळजी घेत असतो, आपण निरोगी कसे राहू शकतात, त्यासाठी काय खाणे महत्वाचे आहे काय नको याची तंतोतत काळजी घेत असतो तर आपल्या ती चालना देण्यासाठी आपला मेंदूहि निरोगी राहण्यासाठी आपण काय करावे हे तुम्हाला माहित आहे का ? पोषक तत्वांची आवश्यकता असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा-3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खावेत. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा हे जाणून घेऊया.

पूर्ण धान्य – पूर्ण धान्य खाल्ल्याने आपला मेंदू निरोगी राहतो. तज्ञांच्या मते, मेंदूची शक्ती मजबूत करण्यासाठी आहारात व्हिटॅमिन-ई युक्त पदार्थांचा समावेश करू शकता. संपूर्ण धान्यामध्ये पोषक तत्वांसोबत व्हिटॅमिन-ई देखील भरपूर प्रमाणात आढळते. आहारात ब्राऊन राइस, बार्ली, गहू, दलिया आणि तृणधान्ये यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.

फॅटी फिश – फॅटी माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिडचे प्रमाण खूप चांगले असते. हे तुमच्या मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून देखील संरक्षण करते. याशिवाय मासे मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे निरोगी मेंदूसाठी मासे खावेत.

शेंगदाणे – हिवाळ्यात शेंगदाणे खायला सर्वांनाच आवडते. शेंगदाण्यात पोषक तत्व, अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यांचे सेवन केल्याने ऊर्जेची पातळी वाढवण्यासही मदत होते.

अंडी – अंड्यांचे सेवन करणे हे शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन-बी 6, व्हिटॅमिन-बी12 आणि फॉलिक ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते. नियमितपणे अंडी खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले असते. तुम्ही नाश्त्यातही अंडी खाऊ शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम