दै. बातमीदार । २१ नोव्हेबर २०२२ तुळशी हि प्राचीन काळापासून आरोग्यासाठी महत्वाची वनस्पती म्हणून मानली जाते तर हिंदू धर्मात तुळस ही पूजनीय मानली जाते. लोक विधीवत तुळशीची पूजा करतात. आयुर्वेदातही तुळशीला विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात. तुळशीमुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दररोज तुळशीच्या 4 पानांचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
बद्धकोष्ठता दूर होते तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज तुळशीच्या पानांचे सेवनही करू शकता.
हाडे मजबूत होतात तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशिअम आणि फॉलेट यासारखी पोषक तत्वे असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
सर्दी-खोकल्यावर गुणकारी
हवामानातील बदलामुळे अनेकदा आपल्याला सर्दी- खोकल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. ते टाळण्यासाठी चहा किंवा काढ्याच्या रुपात तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. यामुळे आपल्या आरोग्याचे अनेक फायदे होतात. तुळशीची पाने छातीत सर्दी साचण्यापासून मदत करते.
हृदय स्वस्थ ठेवते
तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन करणे आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरते.
कॅन्सर
तुळशीच्या पानांमध्ये असे गुणधर्म असतात जे कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात. तुळशीची पाने ही त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरपासून संरक्षण करण्यास मदत करते.
ताण व चिंता
खराब जीवनशैलीमुळे अनेक लोक आजकाल तणावात असतात. अशावेळी तुळशीचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ते चिंता आणि तणाव यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. रिकाम्या पोटी तुळस खाल्ल्याने ताण दूर होतो.
श्वासाचा दुर्गंध कमी करते
श्वासाला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठीदेखील तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम