सातत्याने फडणवीसांचा अपमान ; खा.सुळे म्हणाल्या…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जून २०२३ ।  राज्यात गेल्या काही दिवसापूर्वी सर्वच वृत्तपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर भाजप व शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आता त्याच जाहिरातीबाबत राष्ट्रवादीचे खा.सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा सातत्याने अपमान केला जात आहे. शिंदे सरकारने जी जाहीरात दिली होती, त्यातही देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्यात आले होते. अशा जाहिरातीची काहीच गरज नव्हती. सातत्याने देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करण्याचे षडयंत्र हे कुणीतरी सत्तेमधीलच लोक करत आहेत. हे दिसून येत आहे.

पुण्यात यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी यशस्विनी सनमान सोहळा पार पाडला. या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सध्या ‘एक दिवस धर्मासाठी’ अशा प्रकारची जाहिरात करण्यात येत आहे. मात्र, माझे आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्यांनी कधीही अशाप्रकारची गोष्ट मला शिकवलेली नाही. हरीचे नाव एकदा घेतले तरी चालते. पांडुरंग असा एकच देव आहे जो म्हणतो मला भेटण्यास येण्याची गरज नाही. तुम्ही चांगले काम करा मी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एक दिवस धर्मासाठी या गोष्टीची गरजच काय? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

यावेळी खासदार शरद पवार, लेखक जावेद अख्तर, जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, फैजया खान, अंकुश काकडे उपस्थित होते. याप्रसंगी कृषी क्षेत्रातील कार्यासाठी भारती स्वामी (कराड ),साहित्य क्षेत्रात डॉक्टर सुनीता बोर्डे -( सांगली), उद्योजकता राजश्री पाटील (नांदेड), सामाजिक क्षेत्रात लक्ष्मी नारायण (पुणे ), क्रीडा प्रशिक्षक शैलजा जैन (नाशिक), पत्रकारिता क्षेत्र शर्मिला गलगुटकर (ठाणे ) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम