अभिनेत्री उर्फीहून वाद पेटला ; दोन नेत्याचे वाक्य युद्ध रंगले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जानेवारी २०२३ गेल्या दोन दिवसापासून अभिनेत्री उर्फी जावेदच्या विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या होत्या तर काल यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या वादात उडी घेतल्यानंतर त्यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट व्हायरल केली होती व त्याच्यात चित्रा वाघ यांना उत्तर दिल्याने चिडलेल्या चित्रा वाघ यांनी देखील आता उत्तर दिले आहे.

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा थेट सवाल उर्फीचे प्रताप थांबले नाहीत तर तिला दिसेल तिथे थोबडवणार, असा इशारा देणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना केला आहे.

सुषमा अंधारे यांच्या पोस्टला भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. तर व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. स्वैराचाराला अटकाव घालणं, हा ही धर्म नाही का ? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का ? लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का?स्री शिक्षित व्हाही, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्या लेकी अभिप्रेत होत्या का? जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का? असा सवालही चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारे यांनी केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझं आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या. छत्रपतींचा आदर्श, सावित्रीचे संस्कार जपू या ..खऱ्या अर्थानं, महिला सक्षमीकरणाचा जागर करू या …हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे, ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का ? व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच. समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे असंही चित्र वाघ म्हणाल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम