वाद पेटला : महतांनी थेट सिनेमागृह पेटविण्याची दिली धमकी !
दै. बातमीदार । १६ डिसेंबर २०२२ । अभिनेता शाहरुख खानच्या अडचणीत आता वाढ होत असतांना दिसून येत आहे. ‘पठाण’ चित्रपटाचे बेशरम रंग हे गाणे रिलीज झाले आहे. मात्र या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीमुळे वाद निर्माण झाला आहे. या गाण्याविरुद्ध आता सर्वोच्च न्यायालयाचे वकील थेट माहिती आणि प्रसारण मंत्रालायाकडे धाव घेतली आहे. तर अयोध्येतील महतांनी थेट सिनेमागृह पेटविण्याच धमकी दिली आहे.
पठान पर बरसे अयोध्या हनुमानगढ़ी के महंत राजूदास.. बोले दीपिका पादुकोण भगवा वस्त्र को बिकनी की तरह पहने हैं.. शाहरुख खान हमेशा सनातन संस्कृति का अपमान करते आए हैं.. ऐसी फिल्म का बहिष्कार करो और थिएटर को फूंक दो.. #Pathan @iamsrk @deepikapadukone @bollywood_life @Bollyhungama pic.twitter.com/gIuOeSyIN0
— Vivek K. Tripathi (@meevkt) December 15, 2022
वकील विनीत जिंदाल यांनी गुरुवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले. दुसरीकडे, अयोध्येचे हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन जनतेला केले. “मी लोकांना आवाहन करतो की, ज्या चित्रपटगृहांमध्ये पठाण दाखवला जाईल, अशा चित्रपटगृहांना आग लावावी,” असे महंत यांनी एका व्हिडिओ शेअर करून म्हटले आहे, लाईव्हहिंदुस्तानने याबाबत वृत्त दिलं आहे.
आपल्या तक्रारीत वकिल जिंदाल यांनी म्हटलं की, बेशरम रंग’ हे गाणं अश्लील आहे. यामध्ये दीपिका पदुकोण भगवी बिकिनी परिधान करताना दिसून येत आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. भगवा हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु बॉलिवूड या गाण्यात अश्लील चाळे करून अभिमान आणि भक्तीच्या रंगाचा अपमान करत असल्याचंही जिंदाल यांनी नमूद केलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम