चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार ; एकाच दिवसात सापडले इतके रुग्ण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ डिसेंबर २०२२ । देशात २०१९ मध्ये कोरोनाने जो हाहाकार माजविला होता तो पुन्हा आता चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा रुग्ण वाढत आहे. एकाच दिवसात या देशात ३७ मिलियन अर्थात ३.७ कोटी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या आठवड्यातील एका दिवसांत झालेली ही सर्वाधिक नोंद आहे.

या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या २० दिवसात २४८ मिलियन लोक संसर्गबाधित झाले होते. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य कमिशनची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीतील मिनिट्स चीनच्या टॉपच्या अधिकाऱ्यांकडून ब्लुमबर्गला प्राप्त झाले आहेत, याद्वारे त्यांनी वृत्त दिलं आहे.

२० डिसेंबर रोजी ३७ मिलियन अर्थात ३.७ कोटी बाधित रुग्णांची एका दिवसात नोंद झाली आहे. ही आकडेवारी चीनच्या अधिकृत टॅलीशी मिळतीजुळती नाहीये. कारण चीनच्या टॅलीनुसार त्या दिवशी फक्त ३,०४९ संसर्गबाधित रुग्णांची नोंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण जर हा एकाच दिवसात ३७ मिलियन बाधितांचा आकडा खरा असेल तर त्यामुळं यापूर्वी जानेवारी २०२२ रोजी नोंदवलेला ४ मिलियन बाधितांचा रेकॉर्ड मोडणार आहे. चीनने आपल्या शून्य-कोविड धोरणात बदल केल्यानंतर काही आठवड्यांनंतर संक्रमणामध्ये वाढ होत आहे. चीनमधील कोरोना उद्रेकाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत. यामध्ये रुग्णालयांचे भीषण चित्र दिसत आहे, कारण आरोग्य सेवांवर प्रचंड ताण आलेला दिसत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम