कोरोनाचा हाहाकार : चीनमध्ये रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणेही मुश्किल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ डिसेंबर २०२२ । देशातून गेलेला कोरोनाचे सावट पुन्हा गडद होताना दिसून येत आहे जगातील चीन, जपान, ब्राझील, दक्षिण कोरिया या देशांमध्ये करोनाचा नवा व्हेरियंट धुमाकूळ घालतो आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आले आहे. चीनमधील रुग्णालयात रुग्णांना बेड मिळणेही मुश्किल झालं आहे. सरकार जरी आकडे लपवण्याचा प्रयत्न करत असले तरी सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहेत. चीनमधील करोना संकटाचा एक भयंकर व्हिडिओ समोर आला आहे.

चीनची राजधावी बीजिंगमधील एका रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. यात काही रुग्णांचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत. तर, एका बाजूला रुग्ण व्हिलचेअरवर बसलेले आहेत. रुग्णालयात रुग्णांची संख्याही वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी चीन सरकारने झिरो कोव्हिड पॉलिसीतून नागरिकांना सूट दिली होती. त्यानंतरच अचानक रुग्ण वाढू लागले आहेत. तसंचचीनमध्ये लसीकरणाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळं १० लाखाहून अधिक लोकांचा करोनामुळं मृत्यू होऊ शकतो, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत चीनी आरोग्य यंत्रणाचे अपयश स्पष्टपणे दिसत आहे. बीजिंगमधील चुइयांग्लु रुग्णालयात हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. यात एक रुग्ण सफेद चादरीत ठेवलेल्या एका मृतदेहाजवळच बसलेला आहे. त्याचबरोबर तिथेच एका खाटेवर आणखी एक मृतदेह आहे. इतकंच नव्हे तर, रुग्णालयातील जमिनीवर मृतदेहांचा खच पडला आहे. रुग्णालयात मृतहेद आणि रुग्णांना भरुन गेलं आहे. व्हिलचेअरवरही रुग्णांना बसवण्यात आलं आहे. तर, रुग्णालयाबाहेर रुग्णांची लांबच लांब रांग आहे. करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळं चीनच्या आरोग्य यंत्रणेवर दबाव आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. तरीही त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या ९० दिवसांत देशात ६० टक्के म्हणजेच ८० कोटी लोकांना संसर्ग होऊ शकतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम