चीन पाठोपाठ दक्षिण कोरियातही कोरोना वाढला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जानेवारी २०२३ जगभरात चीनमध्ये सुरु झालेल्या कोरोनाने आता जगातील विविध देशात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतांना दिसून आले आहे. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियातही कोरोनाचा मोठा प्रमाणात फैलाव सुरु आहे.

आज (रविवार) दक्षिण कोरियामध्ये सलग पाचव्या दिवशी कोविड-19 ची नवीन प्रकरणं कमी झाली. परंतु, गंभीर आजारी रुग्णांची संख्या जवळपास आठ महिन्यांत सर्वाधिक झालीये. देशात आतापर्यंत 57,527 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

देशानं 57,527 नवीन कोरोना संसर्गाची पुष्टी केलीये. यात परदेशातील 110 जणांचा समावेश आहे. देशातली एकूण संख्या 29,116,800 वर पोहोचली आहे. योनहाप वृत्तसंस्थेनं कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक एजन्सीच्या (KDCA) हवाल्यानं ही माहिती दिली आहे. KDCA नुसार, देशात आतापर्यंत 63 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 32,219 झाली आहे. तर, मृत्यू दर 0.11 टक्के आहे. याशिवाय, गंभीर आजारी रुग्णांची संख्या आदल्या दिवशी 557 वरून 636 वर पोहोचलीये.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम