कोरोना सावट : परदेशातून आले ५३ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जानेवारी २०२३देशाभारत कोरोनाने दोन वर्षापूर्वी हाहाकार माजविलयानंतर पुन्हे चीनमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. चीनसह जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसून येत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे केंद्र सरकारकडून आवश्यक सुचना देण्यात आल्या आहेत. अशातच देशाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

परदेशातून भारतात आलेले 53 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. भारतामध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी केली जात आहे. त्याशिवाय प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. देशतील कोरोनाची सद्यपरिस्थिती आटोक्यात आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, पण खबरदारी घेणे आवश्यक आहे असंही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर चीन, दक्षिण कोरिया, टोकियो, अमेरिका आणि जपान यासह अनेक देशांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे भारतात वेगाने उपाययोजना सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विमानतळावर केल्या जात असलेल्या रँडम कोविड चाचणीमध्ये आतापर्यंत 53 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, हे प्रमाण 0.94 टक्के आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम